Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेत्रीच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर चोरी.

अभिनेत्रीच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर चोरी.

पुणे: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पवना धरणाच्या बँक वॉटरला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊसमध्ये चोरी झाली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसवर चोरी करताना चोरट्यांनी रोख रक्कम व टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी मोहम्मद अझहर उद्दीन यांचे पीए मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोहम्मद अजहर उद्दीन यांची पत्नी व अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मालकीचा तो फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या पाठीमागून चोरट्यांनी प्रवेश करत ग्रील उचकटून आत प्रवेश केला व 57 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे पुढील तपास करत आहेत.

The post अभिनेत्रीच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर चोरी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka