Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा.

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा.

मुंबईः बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) संध्याकाळी मुंब्रा परिसरात एन्काऊंटर झाला आहे. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली.

त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. सदर खळबळजनक घटनेनंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरीष्ठ डीसीपी पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ज्या पोलिसांच्या गाडीत अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला त्याची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ठाणे पोलिस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेडग्राऊडमध्ये ठेवण्यात आली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमला या पोलिस वाहनातून चार बुलेट शेल सापडले आहेत. अक्षय शिंदे याने एकुण तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी एपीआय नीलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळी मिस फायर झाल्या होत्या. तर एक गोळी पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली असून त्यात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदे याच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka