Dailyhunt
अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट.

अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट.

मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या युवकाला अटक केली होती. बदलापूर प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना पोलिसांनी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर केले होते.

याप्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.

राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना यापूर्वीच क्लीन चीट मिळाली आहे. त्यात आता न्या. दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिल्याने पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून मात्र एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोर्टाने नव्हे तर डीजीपींनी एसआयटी स्थापन करावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. अशातच आता पोलिसांना क्लिन चीट देण्यात आली आहे.

The post अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka