Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी.

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी.

ठाणे : बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची आत्महत्या नाही तर एन्काऊंटर झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला असून, या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली नसून अक्षयचा एन्काऊंटर झाला आहे. अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली. त्याने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी बंदूक चालवली आहे.

तळोजा जेलमधील सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली आहे. साधारण आज (सोमवार) 6.30च्या सुमारास पोलीसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपी अक्षय शिंदे याने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला.

पोलिसांच्या गोळीबारामुळे जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदे याला मृत घोषित केले. जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka