Dailyhunt
अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव.

अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव.

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने युवतीवर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या युवतीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ इस्ट- वेस्ट पुलावरुन लोकल पकडण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. युवकाने रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार केले. यामध्ये युवती गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हल्लेखोर युवकाला ताब्यात घेतले आहे. प्रेमप्रकरणातून हत्या झाली की इतर आणखी काय वाद आहे, याबाबतचा तपास पोलिस करत आहे.

आज (सोमवार) दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शीने युवकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, रागाच्या भरात त्याने युवतीवर सपासप वार केले.

The post अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka