Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा.

मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मलाबार हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

योगिता वेदवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. योगिता वेदवंशी तिचा पती सुमित आणि 5 वर्षांच्या मुलासोबत मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. योगिताचे लग्न हे 6 वर्षांपूर्वी झाले होते. सुमित हा योगिताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत होती.

सुमित मंगळवारी रात्री दारूच्या नशेत घरी परतला. घरी परतल्यावर पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून त्यांचा 5 वर्षांचा मुलगा झोपेतून उठला. मात्र, तरीही दोघांमधील वाद थांबला नाही. वाद वाढतच गेल्यानंतर सुमितने पत्नी योगिताचा गळा दाबला आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The post अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka