Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार.

अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार.

मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत गर्जे याच्या मोहोज देवढे येथील घरासमोरच काल त्यांच्यावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घरापासून काही अंतरावर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाच्या युक्तीवादावेळी कोर्टात अनंत गर्जेच्या वकिलांनी प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा केला होता.

गौरी पालवे यांचे वडील अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन गौरी पालवेंचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. अनंत गर्जेसह त्याच्या भावंडांवर देखील आरोप आहेत. त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गर्जेच्या कोठडीची मागणी केली.

अनंत गर्जेचे वकील अॅड. मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यातून डॉ. गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले. घटना घडली तेव्हा डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घरी धाव घेतली. गौरीने नेमकी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली? याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहे.

गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

Loading…

The post अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka