Dailyhunt
अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!

अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अरविंद चावरिया हे गेल्या २८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी काम केले असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत.

पोलिस दलामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलात काम करत असताना ताणतणाव असला, तरी हसतमुख राहून ते अनेक विषय मार्गी लावत असतात. पुणे शहर पोलिस दलात ते अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…

अरविंद चावरिया यांचा जन्म जळगावमधील, तसेच एकत्र कुटुंबातील. वडील सहकार खात्यामध्ये नोकरी करत असल्यामुळे त्यांची बदली विविध ठिकाणी होत होती. यामुळे अरविंद चावरिया यांचे शिक्षणही नाशिक, औरंगाबाद, जळगाव आदी ठिकाणी झाले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांना बेरोजगारी पाहायला मिळाली नाही. पण, वडिलांच्या कडक शिस्तीमुळे शिक्षण घेत असतानाच पैशांची किंमतही समजली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच पोलिस दलात नोकरीसुद्धा मिळाली. पोलिस दलात काम करत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

अरविंद चावरिया यांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले आहे. पुणे विद्यापीठामधून बीएससी १९९० मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाले. यावरूनच त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची जाणीव होते. कॉलेज जीवन संपते ना संपते तोच त्यांना एमपीएससीच्या माध्यमातून पोलिस अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. लहान वयात नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी पुरेपूर फायदा उठवत अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

वडिलांच्या चॅलेंजमुळेच पोलिस अधिकारी…
अरविंद चावरिया यांचे वडील सहकार खात्यामध्ये नोकरीला होते. वडील अत्यंत कडक शिस्तीचे. हीच शिस्त अरविंद चावरिया यांच्याकडेही पुढे आली. वडिलांना सरकारी नोकरी असली तरी मुलांना पैशांची किंमत कळावी म्हणून ते कधी पैसे हातात देत नसत. स्पर्धा परीक्षेचा क्लास लावण्यासाठी एकदाच पैसे देणार असल्याचे सांगतानाच स्वतःला सिद्ध करण्यास सांगितले होते. यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालो नाही तर परत पैसे मिळणार नव्हते. वडिलांचे चॅलेंज अरविंद चावरिया यांनी स्वीकारले. रात्रंदिवस अभ्यास सुरू केला आणि पहिल्या प्रयत्नातच परीक्षा उत्तीर्ण झाले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा आनंद झाला होता. पण, वडिलांचे चॅलेंज हे सकारात्मक घेतले आणि त्यांच्यामुळेच परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस अधिकारी झालो, असे अरविंद चावरिया अभिमानाने सांगतात.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka