Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

ठाणे: बदलापूरमधील शाळेतील चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा आज (सोमवार) प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये असलेल्या अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदुक हिसकावून घेतली आणि स्वत: वर गोळी झाडली.

या गोळीबारात अक्षय हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्याला पोलिस स्टेशनला घेऊन जात होते. जीपमधून नेत असताना अचानक अक्षय शिंदे याने एका पोलिस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि पळ काढला. यावेळी त्याने पोलिसांवरच 3 राऊंड फायर केले होते. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. अक्षयला एक गोळी लागली आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबार एक पोलिस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय शिंदे याने पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे. हा एन्काऊंटर नसून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सध्या अक्षयची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka