ठाणे : एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला होता. अक्षय शिंदे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पीडित चिमुकल्यांसमोर आरोपीची ओळख परेड करण्यात आली आहे.
बदलापूर प्रकरणात पीडित चिमुकल्यांसमोर आरोपीची ओळख परेड करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित चिमुकल्यांनी आरोपी अक्षय शिंदे याला ओळखले आहे. शनिवारी कल्याण कोर्टामध्ये आरोपीची ओळख परेड करण्यात आली. चिमुकल्यांनी आरोपी अक्षय शिंदे याला ओळखल्यामुळे पोलिसांच्या हाती या प्रकरणात आता मोठा पुरावा लागला आहे.
दुसरीकडे अक्षय शिंदे हा मानसिक दृष्ट्या फीट नसल्याचा दावा त्याच्या आईकडून करण्यात आला होता. मात्र अक्षय मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा मोठा पुरावा समोर आला आहे. एसआयटीने अक्षयची पहिली पत्नी शोधून काढली आहे, त्याच्या पहिल्या पत्नीने धक्कादायक खुलासे केले आहेत.
अक्षयच्या पहिल्या पत्नीने पोलीस जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीने अक्षयवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. अक्षय शारिरीक संबंधांबाबत विकृत असल्याचं त्याच्या पहिल्या पत्नीने म्हटले आहे. अक्षय शारीरिक संबंधाबाबत खूप आक्रमक असायचा असेही तीने म्हटले आहे. त्यामुळे अक्षय मानसिक दृष्ट्या फीट असल्याचा मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. या पुराव्यामुळे अक्षयची कोणतीही मानसोपचार चाचणी आता करण्यात येणार नाही. आरोपीने दोन वर्षात तीन लग्न केले, त्यातील दोन पत्नी त्याच्यासोबत राहात नाहीत तर तिसरी पत्नी गरोदर आहे.
The post बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

