Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे.

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे.

ठाणे : बदलापूरमध्ये एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी सफाई कामगार अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात एसआयटीला मोठे यश आले आहे. अक्षय शिंदे हा मानसिक दृष्ट्या फीट नसल्याचा दावा त्याच्या आईकडून करण्यात आला होता. मात्र, अक्षय मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा मोठा पुरावा आता समोर आला आहे. एसआयटीने अक्षय शिंदे याची पहिली पत्नी शोधून काढली आहे, त्याच्या पहिल्या पत्नीने धक्कादायक खुलासे केले आहेत.

अक्षयच्या पहिल्या पत्नीने पोलिस जबाबात लैंगिक अत्याचाराचे धक्कादायक खुलासे केले आहेत. अक्षय शारिरीक संबंधांबाबत विकृत असल्याचे त्याच्या पहिल्या पत्नीने म्हटले आहे. अक्षय शारीरिक संबंधाबाबत खुप आक्रमक असायचा असेही तीने म्हटले आहे. त्यामुळे अक्षय मानसिक दृष्ट्या फीट असल्याचा मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. या पुराव्यामुळे अक्षयची कोणतीही मानसोपचार चाचणी आता करण्यात येणार नाही. आरोपीने दोन वर्षात तीन लग्न केले, त्यातील दोन पत्नी त्याच्यासोबत राहात नाहीत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka