Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात.

भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात.

बुलढाणा : बुलढण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले आहे.

पत्रात आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. आमदार श्वेता महाले या पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. यानंतर पोलिस पुढील तपास सुरू करतील. दरम्यान, आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावच्या मही येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने ही कारवाई करत या आरोपींना ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.

The post भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka