अकोले (अहमदनगर) : भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे. सद्दाम शेख (वय 26, रा. पूनमनगर, शिर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात. शिर्डी परिसरातील सहा युवक भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी सद्दाम शेख हा युवक पाण्यात बुडाला.
पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सद्दामचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post भंडारदरा धरणात बुडून युवकाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

