Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार.

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार.

वी दिल्लीः पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली आहे. भारतीय जवानाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने जवानाला परत करण्यास नकार दिला आहे.

यामुळे जवानाचे कुटुंबिय काळजीत आहे.

बीएसएफच्या 182व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग 23 एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले असताना पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना पकडले आहे. पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, बीएसएफ जवानाबद्दल कोणतीही माहिती नाही. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तीन ध्वज बैठका झाल्या आहेत. पण जवानाची अद्याप सुटका झालेली नाही. अटक केलेल्या जवानाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत जवानाला परत करण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर, बीएसएफने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सर्व युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले आहे.

बीएसएफने पाकिस्तानी सैन्यासोबत पुन्हा एकदा फील्ड कमांडर स्तरावरील ध्वज बैठकीची मागणी केली आहे. बीएसएफच्या महासंचालकांनी केंद्रीय गृहसचिवांना संपूर्ण घटनेची आणि सैनिकाच्या सुरक्षित परतीसाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली आहे.

दरम्यान, बीएसएफ जवानाच्या अटकेमुळे त्याचे कुटुंब खूप चिंतेत आहे. बीएसएफ जवान पीके सिंग हे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. अटक झाल्यापासून त्यांचे कुटुंब खूप चिंतेत आहे. त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला लवकर परत आणण्यासाठी सरकारकडे आवाहन केले आहे. जवानाच्या परतीसाठी पाकिस्तान रेंजर्सवर दबाव आणला जात आहे. ध्वज बैठकींच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

soldier-chandu-chavan

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka