Dailyhunt
'भावपूर्ण श्रद्धांजली बायको' असा स्टेटस ठेवला अन् केला पत्नीचा खून.

'भावपूर्ण श्रद्धांजली बायको' असा स्टेटस ठेवला अन् केला पत्नीचा खून.

रभणी : एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील वाघे गावात घडली आहे. आरोपीने हत्येच्या चार दिवस आधी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून पत्नीला श्रद्धांजली वाहिली होती.

यानंतर त्याने पत्नीची हत्या केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विद्या विजय राठोड (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विद्या विजय राठोड या महिलेचा काही वर्षांपूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघे येथील विजय राठोड यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर मात्र पती-पत्नीमध्ये भांडण होऊ लागली. या दाम्पत्यांना दोन मुलंही झाली. पण दोघांमधील भांडण काही कमी झाले नाही. यामुळे कंटाळून विद्याने आपल्या माहेरी सोनापूर तांडा येथे वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

विद्या गुरुवारी दुपारी आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत होती. दुपारी दोनच्या सुमारास विजय त्या ठिकाणी आला. दोघांमध्ये बोलणं होत असतानाच शाब्दिक चकमक उडाली आणि अचानक पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. यावेळी चिडलेल्या विजयने सोबत आणलेले धारदार शस्त्र काढले आणि पत्नी विद्या हिच्या अंगावर सपासप वार सुरु केले. यात विद्या गंभीर जखमी झाली. आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील धावतपळत आले. विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्याला मृत घोषित केले.

दरम्यान, विजयने रविवारी स्वतःच्या मोबाईलवर विद्या राठोड हिचा फोटो ठेवून त्याखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा मजकूर लिहिला होता. त्यानंतर विजयने बुधवारी ‘भांडण झाल्यावर लोक त्यांचा व्हॉट्सअप डीपी हटवतात, मी लोकांनाच हटवतो’ असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! नवजात बाळाला रस्त्यावर फेकले; थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले तरीही…

धक्कादायक! प्रेमीयुगलाची हत्येपूर्वी काढली होती गावातून धिंड…

अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असे मांत्रिकाने सांगितले अन् केले तीन तुकडे…

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

नाशिक! प्रेमसंबंध ठेवण्यास भाग अन् गळ्यात हात टाकलेला फोटो केला शेअर…

The post ‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा स्टेटस ठेवला अन् केला पत्नीचा खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka