Dailyhunt
भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी अझर शेख याला घेतलं ताब्यात.

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी अझर शेख याला घेतलं ताब्यात.

पुणे: भिगवण (ता. इंदापूर) येथील युवतीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. युवतीने न्यायालयात येऊन जबाब नोंदवला आहे. आपले संबंधित युवकावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेले होते, असा जबाब न्यायालयात दिला आहे.

शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचे देखील म्हटले आहे.

युवतीला सध्या सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी सुधारगृहात केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. आता या भिगवण कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी संबंधित युवकाचा चुलता अझर शेख याला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. या अपहरण प्रकरणात अझर शेख यांचाच दोघांना पाठिंबा होता, अशी चर्चा आहे. अशात अझर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अझर शेख हा दौंड तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता मानला जातो. पोलिसांनी भिगवण प्रकरणातील युवकाचा चुलता अझर शेखला ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून मिळाली नाही.

दरम्यान, या प्रकरणातील युवक आणि युवती ज्यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्याच्या काही तास आधी अझर शेख याने सोशल मीडियावर एक स्टेटस अपलोड केले होते. ‘सदैव एकनिष्ठ’ असे त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले होते. त्यामुळे भिगवण प्रकरणात तरुण-तरुणीला पळवून लावण्यात त्यांचाच हात असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच त्यांच्यावर दौंड परिसरातील विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अशात अझर शेखला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. मात्र त्याला नेमक्या कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतलंे ही माहिती कळू शकली नाही. या कारवाईबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे.

पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…

भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…

भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…

भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka