Dailyhunt
बीड! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले.

बीड! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले.

बीड : प्रियकरावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती आणि सध्या पोलिस भरतीची तयारी करत होती.

अयोध्या व्हरकटे हिची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी राठोडची जवळीक अयोध्याशी वाढली. यामुळे फडताडे हिच्या मनात राग निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरात बोलावून घेतले. तेथे आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला.

यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव रचण्यात आला. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून फडताडेच्या मुलाने आपल्या ओळखीच्या व्यक्तीची स्कूटी घेतली. त्यात मृतदेह ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकला. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! नवऱ्याच्या प्रेयसीला पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले अन्…

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

थरार! मैत्रिण पाठलाग करतेय म्हणून वेगाने गाडी पळवली अन् गेला ५ जणांचा बळी…

पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…

The post बीड! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka