Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड हादरले! अल्पवयीन मुलीच्या आईचेच निघाले जावयासोबत अनैतिक संबंध.

बीड हादरले! अल्पवयीन मुलीच्या आईचेच निघाले जावयासोबत अनैतिक संबंध.

बीड : सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलीच्या आईनंच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. शिवाय, अल्पवयीन मुलीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची घटना घडली.

अल्पवयीन मुलीने धारूर पोलिसांकडे घटनेची तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे तिच्या आई आणि नातेवाईकांनी मनाविरुद्ध लग्न लावून दिले. त्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे. मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून मुलीने 2022 मध्ये आजी आजोबांचं घर गाठले आणि एका सेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांना हा सगळा प्रकार सांगितला. तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आई सोबत राहत होत्या. 2016 मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले होते. 2017 मध्ये मुलगी सातवी इयत्तता शिकत असताना तिच्या आईने गावातील एका युवकासोबत तिचे लग्न धारूर मधील एका मंदिरात लावून दिले. आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू या सगळ्यांनी तिचं लग्न लावले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस तिच्या सासरी नांदायला पाठवले तेव्हा पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता त्या दोघींनीही त्याच्यावर बळजबरी केली, असा आरोप फिर्यादित आहे. या प्रकरणात नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. तू आम्हाला बदनाम करत आहेस असे म्हणत पती आणि आई दोघे मिळून अल्पवयीन मुलीच त्रास देऊ लागले. शेवटी या दोघांच्या त्रासाला कंटाळून गेली आजी आजोबांचं घर गाठले. या त्रासातून सुटका व्हावी यासाठी पीडित मुलीने शेवटी अंबाजोगाई ला जात मानव लोक सेवाभावी संस्थेच्या अधिकारी अरुंधती पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर हे सगळा प्रकार समोर आला. हा घडलेला सर्व प्रकारानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post बीड हादरले! अल्पवयीन मुलीच्या आईचेच निघाले जावयासोबत अनैतिक संबंध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka