Dailyhunt
बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?.

बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?.

बीड: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघात की घातपात? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर अपघात झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामिण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला पकडण्यात आले आहे.

बीज जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक बेकायदेशीर कृत्यांची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळीतील वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप झाले. विद्युत केंद्रातील राखेचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.

परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते. शनिवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राखेच्या काळाबाजाराने स्थानिक त्रस्त आहेत. राखेची वाहतूक करणारे टिप्पर, ट्रक हे उघड्याने राखेची वाहतूक करतात. त्यामुळे राख उडते आणि लोकांच्या डोळ्यात जाते. त्याशिवाय, राखेमुळे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत.

The post बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka