Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड! मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू.

बीड! मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू.

केज (बीड) : दोन कोटींच्या खंडणी प्रकरणाने संपूर्ण राज्यात आलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह त्याच्या अन्य साथीदारांची खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असताना कामगाराचा मृत्यू झाल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

रचपाल हमीद मसीह या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आवादा प्रकल्प खंडणी आणि देशमुख खून प्रकरण राज्याच्या केंद्रस्थानी आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने नव्या प्रकल्पांकडून खंडणी घेतल्याशिवाय त्यांना काम सुरू करण्याची मुभा देत नव्हती. असाच प्रकार आवादा कंपनीसोबतही दोन कोटींच्या खंडणी अनुषंगाने घडला. आता त्याच कंपनीच्या प्रकल्पातील एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

पंजाबमधील रचपाल हमीद मसीह हा आवादा कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पात मजूर म्हणून काम करीत होता. रचपाल हा मूळचा पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो प्रिमियर हेवी लिफ्ट असे नाव असलेल्या कंत्राटदाराकडे कामाला होता. केज शहरातील केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बारसमोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याचा चेहऱ्यावरून आणि खिशातील ओळखपत्रावरून अधिक चौकशी केली असता तो मस्साजोगच्या आवादा कंपनीत काम करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

केज पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला आहे. शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्येचे नेमके कारण समोर येईल. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस तपासाला अधिक गती मिळेल, असे सांगण्यात आले.

The post बीड! मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka