Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित.

बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित.

बीड : बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमुळे चर्चेत असून, पोलिस अधीक्षक (एसपी) नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी मोहीम उघडली आहे. बीडचे पोलिस अधीक्षक कावत यांच्या घरातच विचित्र प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

बीडचे पोलिस अधीक्षक कावत हे पत्नीसोबत रविवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान बंगल्याच्या नूतनीकरणाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संशय वाढला. काही वेळाने दरवाजा उघडण्यात आला आणि त्या वेळी आत गांजाचा तीव्र वास पसरलेला होता.

दरवाजा उघडणारा पोलिस शिपाई बाळू बहिरवाळ हा नशेच्या अवस्थेत असल्याचे एसपी कावत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्वरित कारवाई करत एसपी कावत यांनी संबंधित पोलिसाची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. या वैद्यकीय चाचणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर बाळू बहिरवाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka