Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई.

बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई.

बीड : खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून बीडमधील आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर देखील पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्य सनी आठवलेची ही आठवले गँग आहे.

बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. वाल्मिक कराडशी जवळीस असलेल्या सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गॅंगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे. 13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत गोळीबारची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सनी आठवले याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करत एक ऑडिओ क्लीप व्हायरल केली होती. त्यामध्ये, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडचे संभाषण असून कराडच्या सांगण्यावरुन पोलिस कामकाज करत असल्याचा आरोपी सनी आठवलेने केला होता. आता, त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत. त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटले आहे.

The post बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka