Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले 'सरप्राईज गिफ्ट'

बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले 'सरप्राईज गिफ्ट'

बीड : बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध घेत आई-वडिलांना 'सरप्राईज गिफ्ट' गिफ्ट दिले. आईला मिठी मारत मुलगा रडू लागल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणवले होते.

शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला होता. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शोध घेतला पण सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो पुण्यात असल्याचे समजताच पोलिसांनी शोध घेत त्याला बीडला आणले. त्यानंतर आई-वडिलांना शुक्रवारी तपासासाठी मदत हवीय म्हणून कार्यालयात बोलावून घेतले. पोलिस अधीक्षकांसमोर चर्चा सुरू असतानाच मुलाला समोर आणत 'सरप्राईज गिफ्ट' दिले. यावेळी मुलासह सर्वच नातेवाइकांना अश्रू अनावर झाले.

राजू काकासाहेब माळी (वय २४, रा. खळवट लिमगाव, ता. वडवणी) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्याला शिक्षणासाठी नाळवंडी (ता. बीड) येथे ठेवले होते. २०१७ साली तो शिक्षणाचा कंटाळा आणि रागाच्या भरात निघून गेला. नातेवाइकांनी सहा वर्षे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही. त्यामुळे पिंपळेनर पोलिस ठाण्यात २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. तो पुण्यात असल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पथकाने शोधून आणले.

राजूच्या आई-वडिलांसह आजोबांनाही तपासात मदत हवी म्हणून बीडला बोलावले. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासमोर ते चर्चा करत होते. अचानक उपनिरीक्षक श्रीराम खटावकर हे राजूला घेऊन आले. जेव्हा ओळख पटली तेव्हा राजू आईला मिठी मारत रडू लागला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले. २०१७ साली राजूने पुणे गाठले. सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. त्यानंतर वेल्डिंगचे काम शिकून गुजरातला गेला. आठवड्यापूर्वी पुन्हा पुण्यात आला होता. पुण्यात आल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29)पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30)पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

The post बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले 'सरप्राईज गिफ्ट' appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka