Dailyhunt
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन.

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन.

बीड: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी (ता. ९) अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण सहाजण आरोपी असल्याची माहिती समोर आली असून, दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले आहे.

संतोष देशमुख या हत्या प्रकरणावरून बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने आणि रस्ता रोको करण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सहाजण आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. यातल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तपासात कसूर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संबंधित पीएसआयचे निलंबन केले आहे. याबाबतची माहिती बारगळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ म्हणाले, ‘संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या बाकीच्या आरोपींवर देखील कारवाई करण्याचे काम सुरु आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल. तसेच ज्या पीएसआयवर गावकऱ्यांनी आरोप केले होते, त्या पीएसआयचे त्वरित निलंबन करण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची गावकऱ्यांची मागणी केली होती. ती मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. तसेच गावकऱ्यांची विशेष सरकारी वकिलांची मागणीही मान्य करण्यात आली आहे. आतापर्यंत या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आले असून बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना झाली आहेत.’

The post बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka