Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड! सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू.

बीड! सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू.

बीड : सोशल मीडियावर स्टोरी आणि स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू झाला आहे. दीपक शिवाजी नालकोल (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावर एकमेकांविरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. किरकोळ भांडणाचे रूपांतर अचानक गंभीर संघर्षात झाले आणि या मारहाणीत दीपक नालकोल याला गंभीर दुखापत झाली. दीपकच्या दोन मित्रांनाही गंभीर मार लागला आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. युवकांमध्ये सोशल मीडियावरील वाद किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बुलेटवरून युवतीला कट मारण्याचा स्टंट पडला महागात; दोघांचा जागीच मृत्यू…

पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…

इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…

पुणे! आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka