Dailyhunt
चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन.

चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन.

नाशिकः पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सध्या ते नाशिक कारागृहात आहेत. नाशिक पोलिसांनी चंदू चव्हाण यांना १० जुलै रोजी अटक केली असून, न्यायालयाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.

चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. चंदू चव्हाण यांनी लष्करामध्ये राहून ११ वर्षे सेवा केली आहे. परंतु, लष्करामधून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराने जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, ही प्रमुख मागणीसाठी ते ठिकठिकाणी आंदोलन करत होते. लष्करातून काढल्यानंतर पेन्शन नाही, नोकरी मिळत नाही मग करायचे काय? असा सवालही चंदू चव्हाण त्यांनी उपस्थित केला होता.

चंदू चव्हाण यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी झाली आहे. चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियात लहान मुलगा व गरोदर पत्नी आहे. पेन्शन नसल्यामुळे व उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. नागरिकांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीच्या आवाहनाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून, आपणही मदत करावी, असे आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आर्थिक मदतीसाठी GPay No. : 7620113599

 chandu-chavan-bank-qr-code

The post चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka