Dailyhunt
चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं.

चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं.

खनौ (उत्तर प्रदेश): एका पाच वर्षाच्या चिमुकलीने चुलतीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केल्याची धक्कादायक घटना सहारनपूरमध्ये समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मुलीची चुलती आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

आरोपी चुलतीने मुलीचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरून किचनच्या ग्रीलमधून बाहेर फेकून दिला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर चुलती आणि तिच्या प्रियकराला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या चुलतीचे एका युवकासोबत अनैतिक संबंध होते. चिमुकलीने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. मुलगी कुटुंबात याबाबत सांगेल या भीतीने युवकाने मुलीच्या गालावर जोरात मारले. जोराचा तडाखा लागल्याने मुलगी बेशुद्ध झाली. तिला शुद्धीत आणण्यासाठी चुलती पाणी आणण्यासाठी गेली असता यादरम्यान युवकाने मुलीवर बलात्कार केला. यानंतर दोघांनी तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर किचनमध्ये मुलीचा मृतदेह लपवला होता.

मुलीच्या पालकांना तिचा तपास न लागल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घरी आल्याने आरोपी चुलतीने मृतदेह गोणीत बांधून किचनच्या ग्रीलमधून बाहेर फेकून दिला. तपासादरम्यान श्वान पथकाला गोणीत मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी चुलता-चुलतीला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता चुलतीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिलेनं सांगितले की, तिचे शुभम नावाच्या युवकासोबत सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीचा खून झाला तेव्हा शुभम घटनास्थळी उपस्थित होता. मुलीने दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत एकत्र पाहिले होते. यामुळे दोघांनी तिचा खून केला. याप्रकरणी मुलीची चुलती आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…

विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

The post चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka