Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार.

चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार.

चंदीगड (हरियाणा): पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका महिलेवर (वय ३५) सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

महिलेने सांगितले की, तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. जबरदस्ती करत होता, त्यावेळीतिने नकार दिल्यावर नवऱ्याने तिला मारहाण केली. यानंतर मी घराबाहेर पडले. वाटेत मला एक तरुण भेटला. बोलत बोलत तो मला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला. तिथे त्या युवकाने आणि त्याच्या तीन साथीदारांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी माझ्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितले की, एक महिन्यापूर्वी 3 वर्षांच्या मी माझ्या बाळाला नुकतंच गमावलं आहे आणि मी खूप दुःखी आहे. माझ्यावर दया करा, मला सोडा पण त्या नराधमांनी माझे ऐकले नाही आणि माझ्यावर अत्याचार करत राहिले.

रेल्वे ट्रॅक ओलांडताना मी अडकले आणि तितक्यात एक ट्रेन आली, त्यावेळी माझा पाय कापला गेला. महिलेवर रोहतक पीजीआयमध्ये उपचार सुरू आहेत. पानिपत जीआरपीने अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. जीआरपी अंबाला एसपी नीतिका गेहलोत यांनी सांगितले की, महिलेची मानसिक स्थिती ठिक नाही. तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवले जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka