Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं.

चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं.

खनौ (उत्तर प्रदेश) : एका चुलतीचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या प्रेमाची कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर विरोध करण्यात आला होता. प्रेमाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गोंडा येथे घडली आहे.

महिलेच्या आत्महत्येमुळे तिची दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक परिसरात राहणारी विधवा महिला (वय ३२) तिच्या दोन मुलांसह सासरच्या घरी राहत होती. महिलेचा पुतण्या रवींद्र कुमार (वय २२) हा सुद्धा याच घरात राहत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. महिलेला आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. दोघांच्या प्रेमाला घरच्यांनी विरोध केला होता.

रवींद्रच्या आई-वडिलांना त्याचे लग्न दुसरीकडे करायचे होते. मात्र, चुलती लग्न जमवून देत नव्हती. पुतण्याही लग्नाला विरोध करत होता. काकू आणि पुतण्याला समाज आणि कुटुंबाचा विरोध सहन झाला नाही. अखेर दोघांनी रविवारी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. कठोवा रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka