Dailyhunt
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा.

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा.

पुणे: सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबाबत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडताना पाहायला मिळतात. पण, पुणे जिल्ह्यात चक्क पोलिस कर्मचारीच याला बळी ठरला आहे.

पोलिस कर्मचाऱ्याला २.३ लाखांचा फटका बसला.

पुणे ग्रामीण पोलिसांत याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. सासवड येथे पोलिस कर्मचाऱ्याने बेकरीच्या दुकानात पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला. त्यावेळी बँक खात्यातून १८,७५५ रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना आला. अचानक इतके पैसे बँक खात्यातून कट झाल्याने त्यांनी लगेच दुसरे बँक खात्यातील रक्कम चेक केली. दुसरे बँक खाते चेक केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला धक्काच बसला. कारण त्या खात्यातून १२,२५० रुपये कट झाले होते. बँक खात्यात केवळ ५० रुपयेच शिल्लक राहिले होते. गोल्ड लोन असलेल्या बँक खात्यातून व्यवहाराबद्दल पोलिस कर्मचाऱ्याला एक ओटीपी आला. पण, त्यांनी तो शेअर केला नाही. तरीही त्यांच्या खात्यातून १.९ लाख रुपये कट झाले होते. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरूनही १४ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने लगेच बँक खाती गोठवल्याने हा व्यवहार झाला नाही.

दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या APK फाईल्सच्या माध्यमातून बँक खाते आणि क्रेडिट कार्डचा अक्सेस घेतला आणि पैसे काढून घेतले. पोलिस कर्मचाऱ्याने सायबर गुन्हेगारांनी पाठवलेल्या कुठल्या तरी लिंकवर क्लिक केले असेल, त्यामुळे त्यांना मालवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खात्यातून पैसे काढले असावे, असा प्राथमिक संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka