Dailyhunt
दारुडा कोंबडा चोरण्यासाठी खुराड्यात शिरला अन् पुढे.

दारुडा कोंबडा चोरण्यासाठी खुराड्यात शिरला अन् पुढे.

रांची (झारखंड): एका दारुड्याने दारू प्यायल्यानंतर कोंबडी चोरण्यासाठी खुराड्यात शिरला आणि अडकला. कोंबड्यांच्या मालकाने त्याला पाहिले आणि खुराड्याचे दार बाहेरून बंद केले. संबंधित दारुड्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

झारखंडच्या नकटीखार गावात ही घटना घडली आहे. एक निवृत्त शिक्षिका आपल्या कुटुंबियांसोबत राहा असून त्यांचा मुलगा रोशन कुमार हा कोंबड्या पाळतो. त्याने कोंबड्यांसाठी एक मोठा खुराडा तयार केला आहे. घराबाहेर हा खुराडा आहे आणि त्याबाहेर घराचा मेन गेट आहे. कोंबड्यांच्या सुरक्षिततेसाठी तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे.

रोशन खुराडा व्यवस्थित बंद करून शुक्रवारी रात्री घरात झोपला होता. रात्री जवळपास दोन वाजता पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. रोशनला जाग आली, काहीतरी गडबड आहे असं वाटलं म्हणून तो बाहेर आला, काळोखात त्याला खुराड्यात एक माणूस कोंबड्या चोरताना दिसला. त्याने त्याला पाहिले आणि खुराड्याचे दार बाहेरून बंद करून घेतले. तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी खुराड्याचं दार उघडलं तेव्हा तो कोंबड्याचोर हा गावातीलच बुधवार सिंह मंझवार असल्याचे दिसले. पोलीस चौकशीदरम्यान तो दुसऱ्यांदा कोंबडा चोरायला आला होता. याआधी काहीवेळापूर्वीच त्यानं या खुराड्यातून एक कोंबडा पळवला होता. बुधवार सिंहला दारू प्यायल्यानंतर कोंबडा खावंसं वाटलं, त्यानं साधारण दहा वाजताच्या सुमारास या खुराड्यातून गुपचूप कोंबडा नेला, तेव्हा रोशन आणि त्याच्या कुटुंबियांना याची कुणकुणही लागली नाही. तो कोंबडा खाल्ल्यानंतर बुधवार सिंह परत दुसरा कोंबडा चोरायला आला. तेव्हा मात्र रोशनने त्याला पकडले. रोशनच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे सत्य समोर आलं तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…

दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…

पुणे: 'मुळशी पॅटर्न'मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

Video: 'जेलर' फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…

The post दारुडा कोंबडा चोरण्यासाठी खुराड्यात शिरला अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka