लातूरः 'कोविड रुग्णाला मारुन टाक' अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरविरोधात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती. याच काळातील एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे, ज्यात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. या क्लिपमध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉ. शशिकांत डांगे यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचे ऐकायला मिळते. डॉ. देशपांडे, नांदेड नाका येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत का, असे विचारतात. त्यावर डॉ. डांगे नकारात्मक उत्तर देतात. यावर डॉ. देशपांडे म्हणतात दायमीच्या पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला… लई पडलंय. हे वाक्य संवाद केवळ असंवेदनशील नव्हे, तर वैद्यकीय नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा आहे.
दरम्यान, एका जीवाला वाचवण्याऐवजी त्याचा अंत करण्याची अशा स्वरुपाची चिथावणी वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात येणं, ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
Video: डॉ. अजय तावरे हाच किडनी रॅकेटचा सूत्रधार…
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
धक्कादायक! डॉक्टर महिलांना गुंगीचे औषध देऊन करायचा बलात्कार अन्…
मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…
डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ…
The post धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

