Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार.

धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार.

रोहतक (हरियाणा) : एका महिला कैद्यावर पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैद्यांकडून महिला कैद्यांवर बलात्कार केला जात असताना पोलिस कर्मचारी कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यामध्ये गुंतले होते. पीडितेने आरोप केले की, तिच्यावर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू होते. त्यासाठी पोलिस कर्मचारी पोलिस व्हॅनमध्ये घेऊन येत होते. त्यामध्ये आणखी दोन कैदी होते. उपचारानंतर पोलिस कागदपत्रांचे काम पूर्ण करत होते. त्यावेळी व्हॅनमध्ये कैद्यांनी बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे. ‘पोलिस कागदपत्रांच्या कामात असताना दोन्ही कैद्यांनी व्हॅनमध्येच बलात्कार केला आहे,’ असे पीडितेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पीडित महिला कैदी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी तिने नैराश्यातून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपाची शहानिशा केली जात आहे.

The post धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka