Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह.

धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह.

त्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदणी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित युवतीच्या सावत्र आई-वडिलांनी, "मुलीने गळफास घेतला असून तिचा मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होतो," अशी माहिती दिली. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी ठेवला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसले. साहित्य भरताना त्याच्या लक्षात आलं, त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की, त्या गाधीमध्ये गुंधळून ठेवलेले साहित्य आहे, त्यात काही संशयास्पद आहे. पोलिसानी त्यांना चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली. मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईचे म्हणणे आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…

भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…

'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka