Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक.

धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक.

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे दोन चिमुकलींच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नराधमाने या मुलींची हत्या केली.

या प्रकरणी आरोपी अजय दास याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन केले.

आरोपीने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने थेट तिचा जीव घेतला. पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने या आरोपीने दुसरी बहिणीचीही हत्या केली. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घराजवळच्या इमारतीजवळच्या ड्रममध्ये मृतदेह फेकले. मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारीचा तपास करत असताना तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला.

अजय दास हा मुलींची हत्या करुन परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आंदोलन केले.

पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड…

The post धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka