Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून.

धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून.

पुणे : पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आले होते. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले.

सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. आणि एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडले आहेत.

१) साहिस्ता लियाकत अन्सारी (वय 36),
२) अमिमा आदिल अन्सारी (वय13),
३) उमेश आदिल अन्सारी (वय 8) या तीन जणांचे मृतदेह सापडले असून
4) अदनान सबाहत अन्सारी (वय 4),
5) मारिया अकिल सय्यद (वय 9) यांचा शोध अद्याप लागलेला नाही.

दरम्यान, अन्सारी कुटुंब भुशी डॅमजवळील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. यादरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते बघता बघता पाण्यात वाहून गेले. उपस्थित पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यासाठी वेळ खूप कमी होता. काही क्षणात ते दिसेनासे झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…

माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka