Dailyhunt
धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या.

धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या.

पाटना (बिहार): दुचाकीला ओवरटेक करत अडवून युवकाची (वय २३) गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सारंगपूर येथे रविवारी (ता. ३१) रात्री ही घटना घडली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

हल्लेखोरांनी मुकेशकुमार शंकर सिंह याच्या गुप्तांगावर बेछूट गोळीबार केला. तब्बल नऊ गोळ्या लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळी ९ रिकाम्या पुंगळ्या आणि मोबाईल आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मुकेशकुमार हा आरा शहरात फायनान्स कंपनीत कामाला होता. तो कलेक्शन बॉय म्हणून काम करत होता. आरोपींनी त्याच्या गुप्तांगावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. तर गुन्हेगारांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश त्याच्या ऑफिसमध्ये पैसे जमा करून दुचाकीने घरी येत होता. त्यावेळी सारंगपूर गावाजवळ त्याचा पाठलाग दुचाकीस्वारांनी केला. तिघे जण एका दुचाकीवर होते. त्यांनी चेहरे झाकले होते. गाडीला ओवरटेक करत मुकेशला थांबवले आणि अचनाक गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर तिघेही हल्लेखोर तिथून फरार झाले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

The post धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka