Dailyhunt
डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ.

डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ.

त्रपती संभाजीनगर: शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नग्न अवस्थेत डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे. एक शासकीय डॉक्टर पुर्णपणे नग्न अवस्थेत रुग्णालय परिसरात फिरत होता. संबंधित डॉक्टराचे नग्न अवस्थेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. अंगावरील कपडे काढून डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. ही सर्व घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, रुग्णालयातून कुणीतरी हा व्हिडीओ लीक केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिडकीन शासकीय रुग्णालय चर्चेत आहे. या रुग्णालयात डॉक्टरांकडून वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. सोबतच डॉक्टर वेळेवर येत नाही अशाही तक्रारी आहे. याच रुग्णालयातील एका डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

प्रेमविवाह! डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं अन् पुढे…

चिमुकल्याने गिळलेली दोन नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश!

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

The post डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka