Dailyhunt
डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं.

डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं.

बुलढाणा : एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती.

या दरोड्याचे आता बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे याने पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता. या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉ. गजानन टेकाळे याच्या घरी पत्नी आणि मुलगी असे तिघे रहात होते. डॉ. गजानन टेकाळे याचे त्याच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या प्रेमसंबंधात पत्नी अडसर ठरत होती. मेहुणीने माझ्या सख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती. त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टेकाळे याने पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. 18 जानेवारीच्या रात्री डॉ. टेकाळे याने पत्नी माधुरी टेकाळे यांच्या एसिडीटीच्या चुर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली. त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली. माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे याने तोंड उशीने दाबून त्याचा जीव घेतता. त्यानंतर कपाटातलं साहित्य अस्ताव्यस्त करून जमिनीवर पाडले जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल. त्यानंतर टेकाळे याने झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्धाअवस्थेत असल्याचा देखावा केला.

सकाळी 19 जानेवारीला ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सूरू केला होता. या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणता पुरावा मिळाला नाही. घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वानपथकाच्या हाती देखील काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.

पोलिसांनी गजानन टेकाळे याच्या फोनमध्ये त्याचा एका युवतीसोबतचा फोटो दिसला. या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत आपल्या सख्या बहिलीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती, त्यामुळंचे पत्नीची हत्या केल्याचे गजानन काळे याने पोलिसांसमोर कबुल केले. पोलिसांनी डॉक्टरसह त्याच्या मेहुणीलाही अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…

मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…

दाजी आणि मेहुणीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली अन्…

धक्कादायक! मेहुणीला सोबत घेऊन गेला अन् पुढे…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

The post डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka