छत्रपती संभाजीनगर : लग्नाचं आमिष दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर शहरातील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डॉक्टर वरूण बाळासाहेब गवळी असे आरोपी डॉक्टरचं नाव आहे. त्याने या महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर चक्क दारू पाजून एका नामांकित हॉटेलमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, एका खाजगी रुग्णालयात फिर्यादी महिला आणि आरोपी डॉक्टर नोकरी करत होते. काही काळानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी डॉक्टरने महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी अत्याचार केला. पोलिस पुढील तपास करत आहे.
The post डॉक्टरने महिला डॉक्टरला नामांकित हॉटेलमध्ये नेऊन पाजली दारू अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

