Dailyhunt
एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन; धमकीत म्हटले की.

एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन; धमकीत म्हटले की.

ळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी दाऊद आणि छोटा शकील गँगकडून देण्यात आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून धमकी दिली आहे.

या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आला. देशासह परदेशातील क्रमांकांचा यामध्ये समावेश आहे. धमकी देणाऱ्याने छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार असल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. हे लोक तुम्हाला मारणार आहेत असे पुन्हा कॉल करून धमकी देणाऱ्याने सांगितले. फोनचे लोकेशन हे अमेरिका, उत्तर प्रदेशातल्या लखनौमधील असल्याची माहिती पुढे आली आहे.

एकनाथ खडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याचे गांभीर्य पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला आहे. खडसेंनी घरवापसी करणार असल्याचे सांगितले आहे.

The post एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन; धमकीत म्हटले की… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka