Dailyhunt
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप.

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप.

त्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी १ च्या सुमारास ओव्हर गावात घडली आहे.

पूजा शिवराज पवार (वय १६, रा. ओहर) असे मृत युवतीचे नाव आहे.

पूजा ही युवती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. खासगी शिकवणीसाठी ती शहरातच राहत होती. सलग सुट्या आणि रक्षाबंधनानिमित्त ती दोन दिवसांपूर्वी गावी गेली होती. गेल्या आठ महिन्यांपासून संशयित आरोपी तरुण कासीम पठाण हा तिला प्रेम कर, म्हणत बळजबरी करीत होता. ती गावी आल्याची संधी साधून त्याने पुन्हा तिला त्रास दिला. त्यामुळे तणावातून पूजाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

दरम्यान, संबंधित प्रकार तिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी विहिरीतून पूजाला बाहेर काढले. तिला घाटी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकारामुळे तिच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी आरोपीच्या अटकेसाठी घाटीत संताप व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी कारवाईचे आश्वासन देत नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

संशयित आरोपी कासीम त्रास देत असल्याचे पूजाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्यांनी कासीमला समजावून सांगत पूजाला त्रास न देण्याची समज दिली होती. त्याला जवळपास तीन ते चार वेळा समजावले होते. मात्र कासीमने त्रास देणे काही थांबविले नाही. त्यातूनच अखेर पूजा हिने टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…

धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…

पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…

The post एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka