Dailyhunt
गौतमी पाटील हिच्या चालकाचा वैद्यकीय अहवाल समोर.

गौतमी पाटील हिच्या चालकाचा वैद्यकीय अहवाल समोर.

पुणे: पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाने रिक्षाला जोराची धडक दिली होती. या घटनेत रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त कार गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. शिवाय, वाहनाचा अपघात झाला त्यावेळी चालकाने मद्यपान केले होत का? अशी चर्चा होती.

पोलिसांना गौतमी पाटील हिच्या चालकाचा वैद्यकीय अहवाल मिळाला आहे. संतोष दिनकर उभे (वय ३०) असे चालकाचे नाव असून, ससूनच्या प्राथमिक अहवालात चालकाने मद्यसेवन केले नसल्याचा ससून रुग्णालयाचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. चालकाच्या श्वासात मद्याचा वास येत नव्हता. चालकाच्या डोळ्याच्या बाहुल्या नेहमी प्रमाणे होत्या, बोलणे स्थिर होते. डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे सदर व्यक्तीने मद्याचे सेवन केले नसल्याचा अहवाल समोर आला आहे. विश्लेषणात्मक तपासणीसाठी चालकाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणात सध्या पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

दरम्यान, पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटील हिच्या भरधाव कारने उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka