Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोव्यामध्ये मध्यरात्री गुगल मॅप लावून मित्र-मैत्रीण फिरत होते अन् पुढे.

गोव्यामध्ये मध्यरात्री गुगल मॅप लावून मित्र-मैत्रीण फिरत होते अन् पुढे.

णजी (गोवा): गोव्यातील सिवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री फेरी धक्क्यावरुन कार थेट नदीत कोसळली. गाडीत दोघेजण होते. त्यातील युवतीने प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतली.

पण, तिच्यासोबत असलेला मित्र मात्र अद्याप बेपत्ता आहे. नदीत कोसळलेली कार पाण्याबाहेर काढण्यात आली आहे.

गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने कार आली आणि थेट फेरी धक्क्यावरुन नदीच्या पाण्यात कोसळली. यावेळी गाडीतील युवतीने गाडीबाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र, तिला गुजरातवरून भेटायला आलेला मित्र अद्याप बेपत्ता आहे. तिचा मित्र बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल, पोलिस यांनी नदीत गेलेली कार नौदलाची मदत घेत बाहेर काढली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाशुदेव भंडारी हा युवक आपल्या मैत्रीणीला भेटायला गुजरातमधून गोव्यात आला होता. ती तरुणी गोव्यातील साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दोघेही भाड्याच्या कारने फिरत होते. फिरता फिरता दोघे सांतइस्तेव येथे पोहोचले होते. यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. बाशुदेव याने गुगल मॅपची मदत घेत घरी परतण्याचे ठरवले.

गुगल मॅप लावल्यानंतर त्या दिशेनं गाडी नेण्यास सुरुवात केली. ते आखाडा-सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचले. काळोखात पुढच्या रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव कार थेट नदीच्या पाण्यात कोसळली. दोघांनाही काही कळण्यापूर्वीच नदीचे पाणी गाडीत शिरू लागले. युवतीने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर येत आपला जीव वाचवला. पण, युवक मात्र अद्याप बेपत्ता आहे. गाडी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. पण, गाडीत कोणीही नव्हते. पोलिसांकडून बेपत्ता युवकाचा शोध सुरू आहे.

दादर स्टेशनमध्ये बॅगेत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट; मैत्रिणीसाठी…

सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…

Video: पत्नी गरोदर अन् नवरा सुमद्र किनारी मैत्रिणीसोबत; रंगेहात पकडले…

मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka