Dailyhunt
हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला.

हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला.

खनौ (उत्तर प्रदेश) : विवाहसोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरीने स्वयंपाक करून सर्वांना जेवण करून खायला घातले आणि झोपायला गेली. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सोने, पैसे घेऊन तिने पळ काढल्याचे समजल्यानंतर नवरदेवाने मोठ-मोठ्याने ओरडत सर्वांना जागे केले आणि घडलेली घटना सांगितली.

भाजी विक्रेता असलेल्या देवेश याच्या पत्नीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले होते. देवेशला दुसरं लग्न करायचे होते. एका नातेवाईकाच्या माध्यमातून त्याची भेट हमीरपूर येथील रहिवासी रजनीश उर्फ ​​पंडित आणि कानपूर रेउना येथील रहिवासी दीपक उर्फ ​​रुद्रेश यांच्याशी झाली. दोघांनी वधूची व्यवस्था करून 70 हजार रुपयांत लग्न लावून देण्याचे सांगितले. देवेशने ही अट मान्य केली. 15 जून रोजी रजनीश आणि दीपक दीपकला भेटण्यासाठी गेले.

देवेश आणि त्याच्या वडिलांसोबत कानपूर सेंट्रल स्टेशनला पोहोचले. दोघांना बलिया येथील मुस्कान नावाच्या महिलेसोबत भेट करून दिली. महिलेसोबत आणखी एक व्यक्ती होती. त्याचे नाव राजकुमार असून तो तिचा भाऊ असल्याचे सांगितले. लग्न निश्चित झालं आणि 70 हजार रुपयांत व्यवहार झाला. यानंतर सर्वजण रसूलाबाद येथील धर्मगढ बाबाच्या मंदिरात पोहोचले, जिथे देवेश आणि मुस्कानने सात फेरे घातले.

मंदिरात लग्न झाल्यानंतर मुस्कान देवेशसोबत तिच्या सासरच्या घरी आली. सोबत भावाला घेऊन आली होती. हनिमूनच्या रात्री मुस्कानने जेवण बनवले. सासरकडील जेवण केल्यानंतर हळूहळू सर्वजण बेशुद्ध झाले. त्यानंतर नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास देवेश शुद्धीवर आल्यावर त्याला नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ बेपत्ता असल्याचे दिसल्यावर मोठ-मोठ्याने ओरडू लागला. देवेश तत्काळ कानपूरला जाणाऱ्या चौकात पोहोचला. नववधू मुस्कान तिच्या भावासोबत गाडीची वाट पाहत होती. देवेशने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दलाल रजनीश उर्फ ​​पंडित आणि दीपक यांना अटक केली.

वधू मुस्कानने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. मुस्कानने दोनदा लग्न केले असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. ती ऑर्केस्ट्रामध्ये नाचायची. वर्षभरापूर्वी तिची राजकुमारसोबत भेट झाली. दोघांचे लग्न झाले. त्यानंतर दोघेही टोळीत सामील झाले. राजकुमार तिचा भाऊ म्हणून जात असे. मुस्कान सात वेळा वधू बनली आहे. या टोळीमध्ये एकूण 16 महिलांचा समावेश आहे, जे औरैया ते झाशीपर्यंत गुन्हे करायचे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…

हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…

हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

नवरी जोरजोरात ओरडू लागली अन् झाला भांडाफोड…

The post हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka