मुंबई : वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या विनोद लाड (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड याचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे.
विनोद लाड 20 जुलै रोजी कामावरून घरी परतत होता. तेव्हा वरळी सी लिंक जवळ अब्दुल गफ्फार खान रोडवर एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने त्याला धडक दिली. विनोदच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर बीएमडब्ल्यू चालक घटनास्थळावरून फरार झाला. पाठीमागून आलेल्या गाडीवाल्याने विनोदला रुग्णालयात दाखल केले होते.
विनोदला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरू होते. शनिवारी उपचारावेळी त्याचे निधन झाले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार चालक किरण इंदुलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

