पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने रविवारी (ता. ७) मध्यरात्री दुचाकीवरील पोलिस मार्शलला उडवले आहे. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खडकी पोलिस स्टेशनचे खडकी बाजार मार्शलवरील कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलिस हवलदार कोळी यांच्या दुचाकीला रात्री दीड वाजता अज्ञात इनोव्हा गाडीने बोपोडी चौक येथे जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकानं गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमध्ये पोलिस हवालदार कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावनेदोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. चालकाचा शोध सुरू आहे. पोलिस हवालदार कोळी यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
The post हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

