Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्.

हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्.

चंद्रपूर: एका आईनेच आपल्या 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलल्यानेतर आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. 10 वर्षीय मुलाने पळ काढल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. ही घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली आहे.

दर्शना दीपक पेटकर (वय 35) आणि समीक्षा दीपक पेटकर (मुलगी, वय13) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बुधवारी (ता. ६) दुपारी दर्शना यांनी दोन्ही मुलांसह खेडी येथील आपल्या शेतामध्ये गेल्या होत्या. प्रथम त्यांनी आपल्या मुलीला विहिरीत ढकलले. तर हे दृश्य पाहून मुलाने तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. त्यानंतर दर्शना यांनी स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मुलाने पळत जात घडलेला प्रकार गावात सांगितला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामागचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka