Dailyhunt
हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर.

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर.

त्रपती संभाजीनगर: पैठणहून दुचाकीने घरी येत असताना समोरून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात आईसमोरच लेकराने जीव सोडला तर आई गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दावरवाडी परिसरात असलेल्या पाचोड-पैठण रस्त्यावर ही घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

समाधान सिताराम दांडगे असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव तर आई सुशीलाबाई सिताराम दांडगे असे गंभीर जखमी झालेल्या मातेचे नाव आहे. समाधान दांडगे त्यांची आई सुशीलाबाई दांडगे हे माय-लेक सोमवारी (ता. १८) सकाळी कडेठाण येथून आपले शेतीचे पीएम किमान योजनेची पैसे येत नसल्याने पैठण येथील तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. तेथील काम आटोपून सायंकाळी हे दोघेजण आपल्या गावी कडेठाण येथे जात होते. ते दोघे पाचोड-पैठण दावरवाडी शिवारात येताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात समाधान दांडगे याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला तर त्याची आई सुशीलाबाई दांडगे या गंभीर जखमी झाल्या आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka