छत्रपती संभाजीनगर : वृद्धापकाळाने आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी सुरू असताना आजोबा सोडून गेल्याचे दुःख सहन न झाल्याने नवविवाहित नातीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नरसिंग हनुवंता गायकवाड असे निधन झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पुनम (उर्फ छकुली) विक्रम तुपे (वय १९) असे मृत झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. आळंदी येथे राहणारे नरसिंग गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. या घटनेमुळे सर्व नातेवाईक आळंदी येथे आले. आजोबांचे निधन झाल्यामुळे नवविवाहित पूनम देखील आळंदी येथे आली. घरातील ज्येष्ठ नागरिक गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.
याचवेळी पूनमच्या छातीत त्रास होऊ लागल्यानंतर तात्काळ आळंदी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पूनमच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी पूनमचा मृत्यू झाला. आजोबांच्या पाठोपाठ नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन…
हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…
हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह…
हृदयद्रावक! मुलाने बसमधून काढले बाहेर डोके आणि झाले धडावेगळे…
The post हृदयद्रावक! आजोबांच्या मृत्यूनंतर नवविवाहित नातीचाही हृदयविकाराने मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

